Tuesday, June 14, 2011

कशी मजेत काढते रांगोळी - MARATHI POEM

टिपक्या टिपक्यांनी पडते पाऊस
जसं पृथ्वीत काढते रांगोळी
कधी सरळ, कधी वाकडे
कशी मजेत काढते रांगोळी

तिच्या ताळात नाचते सृष्टी
काळ्या ढगात लपतोय रवी
मजेत बघतो पाऊसाची कला
कशी मजेत काढते रांगोळी


बिन रंगेच्या तिच्या पाण्याचा तेंब
मिसळून जाते बघ कशी मातीच्या रंगात
कधी हिरवी, कधी काळी, कधी नीळी
कशी मजेत काढते रांगोळी


आनंदानी कोसळणारी ढग
आकाशातून पडणारी वीज
तिच्या जादूत बनते रंगबिरंगी इंद्रधनुष
कशी मजेत काढते रांगोळी


चिकलात नाचती मुले
तिच्या रंगात उडी मारत धबधबे
रात्रीत चांदोबा रमून बघतो
कशी मजेत काढते रांगोळी


माज्या आंगण मात्र का घं कोरडा
येरे येरे पाऊसा, तुला देतो घं पैसा
रुसू नको घं ये ना खाली
मजेत काढ तू रांगोळी


.........................................सुरेश अय्यर

No comments:

Post a Comment